गोपनीयता धोरण
MahaSpardha हा SSPM Career Institute चा ब्रँड आहे.
आम्ही कोणती माहिती घेतो
- नोंदणी करताना: नाव, मोबाईल नंबर, जिल्हा आणि तुम्ही देणार असलेली परीक्षा.
- मॉक देताना: तुमची उत्तरे, वेळ आणि निकाल.
- वेबसाइट वापरताना: कोणती पाने पाहिली आणि कोणत्या जाहिरातीतून आलात (कुकीज आणि जाहिरात मोजमाप).
ती कशासाठी वापरतो
- मॉक घेणे, गुण आणि रँक काढणे, निकाल दाखवणे.
- पुढच्या मॉकची आठवण आणि तुम्ही मागितलेली माहिती WhatsApp किंवा SMS ने पाठवणे. "STOP" लिहून कधीही थांबवता येते.
- तुम्ही कोर्सबद्दल विचारले तरच आमचे समुपदेशक फोन करतात.
लीडरबोर्ड
सार्वजनिक लीडरबोर्डवर फक्त नाव (आडनावाचे आद्याक्षर) आणि जिल्हा दिसतो. मोबाईल नंबर कधीही दाखवला जात नाही.
माहिती कोणाला दिली जाते
आम्ही तुमची माहिती विकत नाही. ती फक्त आमची सेवा चालवणाऱ्या कंपन्यांकडे (होस्टिंग, डेटाबेस, WhatsApp संदेश, कोर्स अॅप) त्या कामापुरती जाते.
तुमचे हक्क
तुमची माहिती पाहणे, दुरुस्त करणे किंवा खाते बंद करून माहिती काढून टाकणे, यासाठी आम्हाला लिहा: mahaspardha1@gmail.com.