परतावा धोरण
खरेदी केलेल्या कोणत्याही कोर्सचे पैसे कोणत्याही परिस्थितीत परत दिले जात नाहीत.
म्हणून खरेदी करण्यापूर्वी कोर्सची माहिती, वैधता, व्हिडिओ आणि PDF ची संख्या नीट वाचा. मोफत लाइव्ह मॉक आणि आमचे मोफत YouTube व्हिडिओ पाहून आमची शिकवण्याची पद्धत आधी तपासा.
कोर्स खरेदी आणि पेमेंट MahaSpardha अॅपवर (Classplus) होते. मोफत लाइव्ह मॉकसाठी कोणतेही शुल्क नाही.
पेमेंट झाले पण कोर्स दिसत नाही
ज्या मोबाईल नंबरने पेमेंट केले त्याच नंबरने अॅपमध्ये लॉगिन केले आहे का ते तपासा. तरीही कोर्स दिसत नसल्यास पेमेंटचा तपशील (तारीख, रक्कम, UPI संदर्भ क्रमांक) mahaspardha1@gmail.com वर पाठवा. आम्ही कोर्स सुरू करून देऊ.
अयशस्वी किंवा दोनदा कापलेले पेमेंट
पेमेंट अयशस्वी झाले पण खात्यातून पैसे कापले गेले, किंवा एकाच कोर्ससाठी दोनदा पैसे कापले गेले, तर ती खरेदी नसते. अशी रक्कम बँक किंवा पेमेंट कंपनी त्यांच्या नियमांनुसार तुमच्या खात्यात परत जमा करते. मदतीसाठी तपशील mahaspardha1@gmail.com वर पाठवा.