अटी व शर्ती
- लाइव्ह मॉकमधील रँक हा फक्त महास्पर्धाचा मॉक देणाऱ्या विद्यार्थ्यांमधील सराव रँक आहे. तो अधिकृत नाही आणि निवडीचे भाकीत नाही.
- एका मोबाईल नंबरवर एकच खाते. एका मॉकसाठी एकच प्रयत्न रँकमध्ये धरला जातो.
- संशयास्पद प्रयत्न (उदा. पेपर चालू असताना वारंवार दुसऱ्या अॅपमध्ये जाणे) गुणांसह दिसतो, पण सार्वजनिक टॉप 100 मध्ये दाखवला जात नाही.
- प्रश्नपत्रिका आणि स्पष्टीकरणे महास्पर्धाची मालमत्ता आहेत. परवानगीशिवाय पुन्हा प्रकाशित करू नयेत.
- उत्तरतालिकेत चूक आढळल्यास आम्ही ती दुरुस्त करून सर्वांचे गुण आणि रँक पुन्हा काढू.
- कोर्स खरेदी MahaSpardha अॅपवर (Classplus) होते. खरेदी केलेल्या कोर्सचे पैसे कोणत्याही परिस्थितीत परत दिले जात नाहीत. तपशील परतावा धोरण पानावर.
- MahaSpardha चा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी (MPSC) कोणताही संबंध नाही.